InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती

- Advertisement -

भारतीय संघाला आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचे  विजेतेपद मिळवून देण्यास अपयशी ठरल्यानंतर आता विराट कोहलीने  एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर विराट पुढील मालिकेत खेळणार नाही असे वृत्त समोर आले होते. भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. एका महिन्याच्या या मालिकेत भारत वनडे, टी-20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

वर्ल्ड कपनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कर्णधार विराट कोहली आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली जाणार असल्याचे वृत्त होते. पण आता नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार विराट वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असल्याचे कळते. यासंदर्भातील वृत्त मुंबई मिररने दिले आहे.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.