Car Update | ‘या’ गाड्यांना म्हणता येऊ शकते लाईफ सेविंग कार

टीम महाराष्ट्र देशा: देशातील कार Car उत्पादक कंपन्या झपाट्याने आपल्या कंपनीच्या कारच्या संख्येमध्ये वाढ करत आहे. त्यामुळे देशामध्ये कार वापरण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाढत्या कारचा संख्येमुळे अर्थातच अपघाताच्या संख्येमध्ये वाढ होणे ही साहजिक आहे. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगल्या असणाऱ्या कार बद्दल माहिती सांगणार आहोत.

किआ सेल्टोस

किआ सेल्टोसमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सहा एअरबॅक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. किआ सेल्टोस ही कार आकर्षक फीचर्स बाजारात उपलब्ध आहे. या फीचर्स मध्ये प्रामुख्याने स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, बीए, हिल असिस्ट कंट्रोल, हायलाइन टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ऑल डिस्क ब्रेक्स, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. किआ सेल्टोस या कारची एक्स-शोरुम किंमत 10.49 लाख रुपये आहे.

ह्युंडाई i20

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी ह्युंडाईच्या या कार मॉडेलमध्ये सहा एअरबॅक्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ही कार अनेक आकर्षक फीचरसह सुसज्ज असून या कारमध्ये Asta (O) ट्रिम प्रकारात सहा एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), पुडल लॅम्प, ABS, इलेक्ट्रॉनिक ब्रेक सिस्टम (EBD), ESC, हिल असिस्टंट सिस्टम, पार्किंग असिस्ट, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, सेंट्रल मोस्ट सेफ्टी फीचर्स आहेत. ह्युंडाईचा या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.92 लाख रुपये एवढी आहे.

ह्युंडाई वेन्यू

ह्युंडाईच्या ह्युंडाई वेन्यू या टॉप मॉडेल मध्ये तुम्हाला सहा एअरबॅक्स उपलब्ध मिळतील. हुंडाई वेन्यू ही कार बाजारात डिझेल आणि पेट्रोल या दोन्ही इंजिन पर्यायासह उपलब्ध आहे. ह्युंडाईची ही कार SX (O) ट्रिममध्ये सहा एअरबॅग पर्यायांसह DCT आणि IMT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स इत्यादी फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 11.92 लाख रुपये एवढी आहे.

ह्युंदाई वर्ना

ह्युंडाई वर्ना मिडसाईज कार SX(O) आणि SX(O) टर्बो ट्रिम प्रकारात 6 एअरबॅग्स सह उपलब्ध आहे. ह्युंडाईची ही कार देखील पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिन पर्याय सह बाजारात उपलब्ध आहे. ह्युंडाई वरणा या कारची एक्स-शोरूम किंमत 13.08 लाख रुपये एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.