Car With Airbags | ‘या’ कारमध्ये उपलब्ध आहेत 6 एअरबॅग, जाणून घ्या किंमत

Car With Airbags | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दरवर्षी लाखो अपघात होतात. या अपघातामध्ये लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागतात. या अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यावर्षी ऑक्टोबरमध्ये मोठी पावलं उचलली आहे. यामध्ये सर्व कारमध्ये किमान सहा एअरबॅग असणे बंधनकारक आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 6 एअरबॅग उपलब्ध असलेल्या कारबद्दल माहिती सांगणार आहोत.

पुढील कारमध्ये उपलब्ध आहेत 6 एअरबॅग (Car With Airbags)

मारुती सुझुकी बलेनो

मारुती सुझुकी बलेनो या प्रीमियर हॅचबॅक कारमध्ये अनेक नवीन फीचर आणि तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या कारच्या Zeta आणि Alpha यासारख्या व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग उपलब्ध आहे. याच्या सहा एअरबॅग व्हेरीयंट एक्स-शोरूम किंमत 8.26 लाख रुपये आहे. यामध्ये ESP, ब्रेक असिस्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, हिल-होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, एबीएस विथ EBD इत्यादी सुरक्षा वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहे.

ह्युंदाई i20

ह्युंदाई i20 या कारमध्ये सहा एअरबॅग फीचर देण्यात आलेले आहे. एअरबॅग फीचरसोबतच या गाडीमध्ये हायलाइन टीपीएमएस, ईएससी, मागील पार्किंग कॅमेरा, आयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकर, हिल असिस्ट कंट्रोल, ईबीडीसह एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर इत्यादी फीचर्स आहेत. या कारची एक्स-शोरुम किंमत 9.59 लखन पासून सुरू होते.

ह्युंदाई वेन्यू

ह्युंदाई वेन्यू या कारच्या SX (O) व्हेरियंटमध्ये सहा एअरबॅग उपलब्ध आहे. त्याचबरोबर यामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल असिस्ट कंट्रोल, हायलाइन टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, एबीएस विथ ईबीडी, रिअर कॅमेरा, ईएससी आणि आयएसओफिक्स अँकरेज इत्यादींचा समावेश आहे. ह्युंदाई वेन्यू या कारच्या SX (O) व्हेरियंटची एक्स-शोरुम किंमत 11.92 लाख रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या