कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्या मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल कारा : तृप्ती देसाई

मुंबई : आगामी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उपमुखमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना उत्सवात गर्दी झाल्यास निर्बंध लावण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत दिले. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख मात्र या आदेशांना धुडकावत असल्याचे दिसत आहे. तसेच कोरोना नियमांचं उल्लंघनही केले आहे. तसेच शेख यांच्या विविध कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं दिसत आहे.

महेबूब शेख यांचे सध्या विविध ठिकाणी दौरे सुरु आहेत. तसेच त्यांच्या कार्यक्रमांना लोक हजेरी लावत असून ठिकठिकाणी जाऊन गर्दी जमवत असल्याचे दिसून येत आहे. शेख हे काल दर्यापुर तालुका जिल्हा अमरावती येथे रात्री १२:३० वाजता पोहचले. यावेळी त्यांच्या उपस्थितीत याठिकाणी गर्दी झाल्याचं निदर्शनास आलं. तसेच त्यांनी ट्विटरवर टाकलेल्या फोटोवरून आता त्यावर टीका होतायत. आता यावरून भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी साधलाय.

सध्या महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. सर्वांसाठीच कडक निर्बंध राज्य सरकारने जाहीर केलेले आहेत परंतु राज्य सरकार मध्ये असलेल्या पक्षाचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना त्यात सूट आहे असे राज्य सरकारने अधिकृत जाहीर करूनच टाकावे. कारण सर्वसामान्यांनी कोणता कायदा मोडला तर तातडीने कारवाई केली जाते परंतु सत्ताधारी पक्षातील नेता, पदाधिकारी यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही आणि सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी स्वतःच्याच पक्षाच्या आदेशाला केराची टोपली दाखवताना दिसत आहेत असं देसाई म्हणाल्या.

औरंगाबादेत बलात्काराचा गुन्हा दाखल असलेला राष्ट्रवादीचा युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख समाजात पुन्हा एकदा स्वतःची चांगली प्रतिमा बनविण्यासाठी अनेक कार्यक्रमांना उपस्थित असतात. परंतु स्वतःची चांगली प्रतिमा बनविण्याच्या नादात नियम पाळायचे विसरतात आणि दुसऱ्यांनाही सांगत नाहीत.असल्या पदाधिकारी आणि नेत्यांवर तातडीने गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे अशी मागणी देसाई यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा