पुण्यात रास्ता रोको केल्यास दाखल होणार गुन्हे

न्याय हक्कासाठी आंदोलन, मोर्चे करण्याचा अधिकार सर्वांना दिलाय. मात्र, पुणे ग्रामीण परिसरात 1 आॅक्टोबरपासून राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर आंदोलने केली तर त्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

नोकरदार आणि नागरिकांना रास्ता रोको आंदोलनाचा त्रास होतो. अनेकदा राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत होते. तसंच पोलीस बंदोबस्त द्यावा लागल्याने गुन्हे तपास आणि पोलीस दलाच्या इतर कामाला वेळ मिळत नाही. यासाठी कलम 8 ब नुसार क्रिमिनल अमेनमेंट 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला जाणार आहे. या प्रकरणात 6 महिने ते 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या – 

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.