CAT Trailer | अभिनेता रणदीप हुड्डाच्या ‘कॅट’ वेब सिरीजचा जबरदस्त ट्रेलर रिलीज
मुंबई: बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) ‘कॅट’ (CAT) या वेब सिरीज (Web Series)च्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन करत आहे. या वेब सिरीजमध्ये पंजाबमध्ये होणाऱ्या ड्रग्स तस्करी बद्दल दाखवण्यात आले आहे. ही वेब सिरीज प्रसिद्ध ओटीपी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) वर रिलीज होणार आहे. ‘कॅट’ या वेब सिरीजमध्ये रणदीप पंजाबमध्ये ड्रग्स तस्करीमध्ये अडकलेल्या आपल्या भावाची सुटका करताना दिसणार आहे.
कॅट (CAT) वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज
अभिनेता रणदीप हुड्डा अनेक दिवसांपासून चित्रपट जगतापासून लांब आहे. अशा परिस्थितीत रणदीप ‘कॅट’ या वेब सिरीजच्या माध्यमातून तो पुनरागमन करणार आहे. शुक्रवारी ओटीपी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर ‘कॅट’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 1.40 सेकंदाच्या या सिरीजचा ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की, कॅट ही स्टोरी पंजाबमध्ये होणाऱ्या ड्रग्स तस्करीवर आधारित आहे. या सिरीजमध्ये रणदीप हुद्दचा भाऊ ड्रग्सच्या तस्करी मध्ये अडकतो आणि पोलिसांच्या ताब्यात जातो. अशा परिस्थितीत रणदीप त्याच्या भावाला ड्रग तस्करीतून वाचवण्याचा प्रयत्न करताना दाखवला आहे.
‘कॅट’ या वेब सिरीज मधील रणदीप हुड्डाचे सरदारजीचे लुक चाहत्यांना खूप आवडले आहे. या वेब सिरीजमध्ये रणदीप गुरुनाम सिंग या पात्राची भूमिका साकारताना दिसत आहे. चाहते रणदीपच्या या वेब सिरीजची आतुरतेने वाट बघत असून प्रेक्षकांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
कधी होणार ‘कॅट’ रिलीज
रणदीप हुड्डाच्या ‘कॅट’ या वेब सिरीजचा ट्रेलर समोर आल्यानंतर चाहत्यांची या वेब सिरीजबद्दल आणखीनच उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे आता चाहते या वेब सिरीजची आतुरतेने वाट बघत आहे. ‘कॅट’ पुढच्या महिन्यात 9 डिसेंबर पासून ओटीपी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रणदीप हुड्डा व्यतिरिक्त काव्या थापर, दानिश सूद, केपी सिंग, आणि गीता अग्रवाल इत्यादी कलाकार देखील दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nawab Malik | तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या, गंभीर गुन्हा दाखल!
- Rahul Gandhi | “राहुल गांधींच्या वक्तव्याचा खरा धोका…”, ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा इशारा
- Oppo Reno 9 Series | ‘या’ दिवशी लाँच होणार Oppo Reno 9 सिरीज
- Nilesh Rane | “ही मस्ती लोक फक्त महाराष्ट्रातच करतात” ; निलेश राणे राहुल गांधींवर संतापले
- Rahul Gandhi | “तुम्हाला बॉम्बने…” ; राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.