कमला इमारत आग दुर्घटना; रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयाची चौकशी होणार : आदित्य ठाकरे

मुंबई : राज्यात आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या ताडदेव परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास एका २० मजली इमारतीत भीषण आग लागली. या लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २३ जण जखमी झाले आहेत. साधारण साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनास्थळाची ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

पण या अपघातात सध्या माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत जखमी झालेल्या रुग्णांना स्थानिकांनी आजूबाजूच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी परिसरातील ३ बड्या रुग्णालयांनी या रुग्णांना उपचार देण्यास नकार दिला.

त्यामुळे या रुग्णालयांविरोधात संतापाची भावना सध्या सर्वत्र व्यक्त केली जात आहे. या जखमींवर सध्या नायर, कस्तुरबा, भाटिया आणि मसीना या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पण यापुर्वी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सुरुवातीला जखमींना उपचारार्थ दाखल करण्यासाठी मसीना, वॉकहार्ट आणि एचएन रिलायन्स या रुग्णालयांमध्ये घेवून गेले.

या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या घटनेची दखल घेत उपचारास नकार देणाऱ्या रुग्णालयावर चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. नायर रुग्णालयात दाखल केलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. तर, कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या