InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

रेल्वेच्या सर्व डबे, मेमू आणि डेमूमध्येही सीसी टीव्ही कॅमेरे बसवणार

रेल्वे प्रवास भीतीविरहित आणि उपद्रवमुक्‍त करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, याअंतर्गत लोकलचे सर्व डबे, मेमू आणि डेमूमध्येही सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या तब्बल दहा हजार 349 डब्यांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात येणार असून, त्यासाठीच्या 356 कोटींच्या खर्चाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनंसपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी ही माहिती दिली.

या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात सध्या पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सुरवातीच्या टप्प्यात मुंबईच्या लोकलमधील महिलांच्या डब्यात हे कॅमरे बसवले जाणार आहेत. मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांवर सीसी टीव्ही आहेत. महिलांच्या केवळ 25 डब्यांमध्ये सीसी टीव्ही बसविले आहेत. महिलांवर होणारे वाढते हल्ले लक्षात घेऊन महिलांच्या डब्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय 2017 च्या सप्टेंबरमध्ये घेण्यात आला होता; मात्र त्याची अद्याप काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली नव्हती.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply