InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नव्या वर्षाचं स्वागत करा; वाकड च्या बॉन साऊथ मधल्या ग्रँड बार्बेक्यू कार्निव्हल मध्ये

जगभरातील ग्रिल खाद्यपदार्थांची रेलचेल असलेला बुफे आपल्या भेटीला आणणा-या बॉन साउथ ने नव्या वर्षाचे भरपूर उत्साहपूर्ण स्वागत करण्यासाठी ग्रँड बार्बेक्यू कार्निव्हल चे आयोजन केले आहे. या कार्निव्हल मध्ये जगात सर्वत्र बार्बेक्यू पद्धतीने केल्या जाणा-या १०१ पदार्थांची संकल्पना आहे. या अनलिमिटेड बार्बेक्यू बुफे नंतर जिभेचे कौतुक करणारी डेझर्ट्स सुद्धा मांडलेली असतील. आणि या सगळ्याच्या जोडीला शोभिवंत सजावट आणि खास डी जे. संगीतही अर्थातच असणार आहे. जादूचे लाइव्ह प्रयोग आणि वैविध्यपूर्ण खेळांनी तुमच्या आनंदात भरच पडणार आहे. ग्रँड बार्बेक्यू कार्निव्हल गाणं, नृत्य आणि खाद्यपदार्थांची लयलूट करत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी तुम्हाला निमंत्रित करीत आहे. या वातावरणातलं थ्रिल आणि मजा अनुभवण्यासाठी बॉन साऊथ ला अवश्य भेट द्या. अनलिमिटेड स्टार्टर्स आणि वैविध्यपूर्ण मेन कोर्स बुफे तुमच्या स्वागतासाठी सिद्ध आहे. अर्थात खास नववर्ष स्वागतासाठी बनवलेली डेझर्ट्स तुमचा आनंद कितीतरी पटीने वाढवतील. तुमची पावले थिरकू द्या, चित्तवृत्ती फ़ुलूद्या आणि खाद्यपेयांचा मनसोक्त आस्वाद घेत सरत्या वर्षाला निरोप द्या. मग वाट कसली पाहताय? आयुष्यात कधीतरीच मिळणारा हा अनुभव घेण्यासाठी बॉन साऊथ वाकड कडे तुमची पावलं वळू द्या!

ग्रँड बार्बेक्यू कार्निव्हल
बॉन साऊथ , वाकड
२६ डिसेंबर – २ जानेवारी
प्रत्येकी रु. ४९९ – रु. ९९९ (तुम्ही निवडलेल्या दिवसानुसार )

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.