InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

प्रियंकाच्या वाढदिवस सेलिब्रेशनला सुरूवात

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या वाढदिवसासाठी एक आठवडा बाकी आहे. १८ जुलै रोजी प्रियंका चोप्रा तिचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत आहे. प्रियंका चोप्राची आई मधु चौप्रा यादेखील आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत आहेत. मधु चोप्रा यांनी इन्स्टाग्रामवर प्रियंकासोबतचा तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे.

प्रियंकाचा लहानपणीचा हा फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावर सर्वांसमोर आला आहे. प्रियंकाच्या लहानपणीचा हा फोटो शेअर करत त्यांनी ‘Birthday bumps… coming up!!!’ असं कॅप्शनही दिलं आहे.

यंदाचा वाढदिवस प्रियंकासाठी खऱ्या अर्थाने खास असणार आहे. निक आणि प्रियंकाच्या लग्नानंतर प्रियंकाचा हा पहिलाच वाढदिवस आहे. सध्या प्रियंका पती निक जोनाससह सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी निक आणि प्रियंकाचा पॅरिसमधील एक फोटो व्हायरल झाला होता.

View this post on Instagram

Mothers joy!

A post shared by Madhu Akhouri Chopra (@madhumalati) on

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply