Celery Seeds | पोटाच्या ‘या’ समस्या दूर करण्यासाठी करा ओव्याचा वापर

Celery Seeds | टीम महाराष्ट्र देशा: ओवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. ओव्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि आयरन भरपूर प्रमाणात आढळून येते, त्यामुळे ओव्याचे सेवन केल्याने पोटाच्या अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्टता, अपचन, पोट फुगणे इत्यादी पोटाच्या समस्यांवर मात करण्यासाठी ओवा उपयुक्त ठरू शकतो. पोटाचे आरोग्य (Stomach health) राखण्यासाठी तुम्ही थेट ओव्याचे सेवन करू शकतात किंवा ओवा पाण्यामध्ये उकळून त्याचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही रात्रभर ओवा पाण्यात भिजवून ठेवून सकाळी रिकाम्या पोटी त्या पाण्याचे सेवन करू शकतात. ओव्याचे सेवन केल्याने पोटाच्या खालील समस्यांपासून आराम मिळू शकतो.

अपचनाची समस्या दूर होते (The problem of indigestion is eliminated-Celery Seeds Benefits)

जेवण झाल्यानंतर आंबट ढेकर येणे किंवा उलट्या होणे यासारख्या समस्या जाणवत असतील, तर या समस्यांवर मात करण्यासाठी ओव्याचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते. भूक न लागणे, अपचन, पोटदुखी या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही ओव्याचे सेवन करू शकतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही ओव्याच्या पाण्याचे सेवन करू शकतात.

पोटातील जळजळ कमी होते (Stomach inflammation is reduced-Celery Seeds Benefits)

पोटातील जळजळ कमी करण्यासाठी ओवा प्रभावी ठरू शकतो. ओव्यामध्ये आढळणारे फायबर आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. आतड्यांशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही ओव्याचे सेवन करू शकतात. ओव्याचे सेवन केल्याने तुम्हाला या समस्येपासून आराम मिळू शकतो.

पचनक्रिया सुधारते (Improves digestion-Celery Seeds Benefits)

ओव्याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होऊ शकते. पोटाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी ओव्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. ओवा पचनसंस्थेला चालना देण्यास मदत करतो. त्यामुळे ओव्याचे सेवन केल्याने पचनशक्ती मजबूत होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

पोटाच्या वरील समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही ओव्याचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा खालील पद्धतीने वापर करू शकतात.

लिंबू पाणी (Lemon water For Weight Loss)

लिंबू पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोक लिंबू पाण्याचे सेवन करतात. लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि उष्माघातापासून संरक्षण होते. लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्याने मेटाबॉलिझम वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

लिंबू सॅलड (Lemon salad For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचे सॅलड खाऊ शकतात. लिंबाचे सॅलड खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामध्ये आढळणाऱ्या फायबरमुळे लवकर भूक लागत नाही, परिणामी वजन कमी होते. त्याचे सेवन केल्याने वजन कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.