InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणाऱ्या औषधांच्या यादीसाठी केंद्र शासनाचा पुढाकार

- Advertisement -

केंद्र शासनाच्या वतीने प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणाऱ्या औषधांची यादी तयार करण्यात येणार आहे. ड्रग्ज कन्सल्टेटीव्ह कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणाऱ्या औषधांची यादी केली जाणार आहे. त्यात ज्या औषधांचा समावेश करण्यात आला असेल केवळ तीच औषधे ओव्हर द काउंटर म्हणजेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय रुग्णांना घेता येणार आहेत.
पहिल्यांदा सरकारकडून ओव्हर द काउंटर मिळणाऱ्या औषधांची यादी करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेण्यात येणाऱ्या औषधांचे प्रमाण कमी व्हावे हा यामागील उद्देश आहे.
डीसीसीच्या निर्णयानुसार, उपसमितीद्वारे या औषधांची यादी तयार करून याबाबतच्या नियमांमध्ये कोणते बदल व्हावेत याचा मसुदा तयार करावा. यासंदर्भात महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे म्हणाले, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणती औषधे मिळतील याची ड्रग्ज कन्सल्टेटीव्ह कमिटी यादी तयार करणार आहे. या यादीमध्ये कोणत्या औषधांचा समावेश करण्यात आला आहे यावर या निर्णयाचा फायदा होईल की तोटा हे सांगता येईल. मात्र यामुळे देशातील फार्मासिस्टची भूमिका वाढेल. कारण रुग्णांना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देताना ते कसे घ्यावे, त्याचे फायदे फार्मासिस्टना समजावून द्यावे लागतील.

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.