शरद पवारांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई : केंद्र सरकार तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहे. ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही त्या राज्याला त्रास देत आहे, असा आरोप करून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ‘देशावर आलेले भाजपाचे संकट परतवून लावा’, असे आवाहन जनतेला केला. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोमणा मारला.

‘पवार साहेब म्हणतात म्हणून केंद्र सरकारचा पराभव होणार नाही. सर्वसामान्य माणसाला काय वाटते त्यावर केंद्रात सरकार कुणाचे असेल ते ठरेल. सर्वसामान्य माणूस सुखी आहे. साडेचार कोटी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जातात. त्यामुळे पवार साहेबांच्या शापामुळे केंद्र सरकार पडणार नाही.’

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या टीकेवर बोलताना पाटील म्हणाले, धाडी कुठे टाकायच्या हे केंद्र सरकार ठरवत नाही. सर्व यंत्रणा या स्वायत्त आहेत. या यंत्रणेच्या वतीने उत्तर द्यायला मी काही त्यांचा अधिकारी नाही. सरकार पडण्याच्या विषयात सांगायचं तर सरकार पडणार नाही, परंतु सरकार पडणार नाही हे वारंवार का सांगावं लागते हा महत्वाचा मुद्दा आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा