“लक्ष भटकवणे, खोट्या गोष्टी पसरवणे आणि तथ्य लपवणे हीच केंद्र सरकारची निती आहे,” : राहुल गांधी संतापले

कोरोनावरील उपययोजनामुळे विरोधक सतत मोदी सरकारवर टीका करत आहे. देशात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. लसींचा कमतरतेमुळे राज्यांमध्ये लसीकरण थांबले आहे. मोदींनी विदेशात लशी पाठवल्यामुळे लशीची कमतरता जाणवत असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

राहुल गांधी म्हणाले, “देशात लसीकरण कमी होत आहे आणि कोरोनामुळे मृत्यू वाढत आहेत. लक्ष भटकवणे, खोट्या गोष्टी पसरवणे आणि तथ्य लपवणे हीच केंद्र सरकारची निती आहे.”

“देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. तसेच, या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे बोलल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मुलांना कोरोनापासून वाचविण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत सर्व तयारी अगोदरच पूर्ण करावी लागेल,” असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.

“येणाऱ्या काळात मुलांना कोरोनापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत बालरोग सेवा आणि लस उपचार प्रोटोकॉल आधीच तयार करणे आवश्यक आहे. भारताच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे आवश्यक आहे”, असे राहुल गांधी म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा