Chagan Bhujbal | राष्ट्रवादीने मविआमधून बाहेर पडावं अशी राऊतांची इच्छा? छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

Chagan Bhujbal | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात खवळली होती. पक्षातील पदाधिकारी आणि आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पवारांनी राजीनामा मागे घेतला. या सर्व घडामोडींवर दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. या अग्रलेखातून पवारांवर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे.

सामना अग्रलेखात नक्की काय म्हटलं आहे? (What exactly does the Samana agralekh say?)

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी हादरली होती. कारण पवारांनंतर आपले कसं होणार? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला होता. पवारांनंतर राष्ट्रवादी सांभाळायला कुणीही वारस नाही. त्यामुळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि पवारांनी राजीनामा मागे घ्यावा लागला. राजकारणामध्ये शरद पवारांच्या शब्दाला मान आहे. पण पक्ष पुढे नेणारा वारसदार ते निर्माण करू शकले नाही, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

सामना अग्रलेखामध्ये केलेल्या टिकेनंतर छगन भुजबळ यांनी राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही. उद्धव ठाकरे यांनी असं सांगितल्यानंतर देखील संजय राऊत यांनी हे सगळं उकरून काढलं आहे. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं संजय राऊत यांना वाटत आहे का? असा प्रश्न छगन भुजबळ उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, “तुमचं जेवढं आयुष्य आहे, तेवढा शरद पवार यांचा राजकीय अनुभव आहे. राष्ट्रवादीतील सर्व नेते आणि कार्यकर्ते काम करण्यासाठी समर्थ आहे. त्यामुळे आमच्यावर टीका करताना विचार करावा.”

महत्वाच्या बातम्या