पोटातून काढले चैन, किल्ल्यांसह ८० वस्तू

एका रुग्णावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्याच्या पोटातून किल्ल्या, चिलीम, नाणी अशा एकूण ८० वस्तू बाहेर काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्या जीविताला आता कोणताच धोका नाही, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी मानसिक संतुलन ठीक नसलेला एक रुग्ण उदयपूरच्या शासकीय रुग्णालयात आला. पोटदुखीमुळे एक्स- रे काढल्यावर नाणी , चिलिम, सोन्याच्या चेन अशा अनेक गोष्टी त्याच्या पोटात अडकल्या होत्या. मानसिक दृष्ट्या आजारी असल्यामुळे त्याने या वस्तूंचे सेवन केलं असणार अशी माहिती रुग्णाच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

त्यानंतर चार डॉक्टरांनी या रुग्णाच्या पोटावर शस्त्रक्रिया करून सर्व वस्तू बाहेर काढल्या. या सर्व वस्तूंचे एकूण वजन ८०० ग्राम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे .

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.