सभापती आरक्षणाची सोडत 16 डिसेंबरला

बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या विद्यमान सभापतींचा कार्यकाळ संपल्याने नवीन सभापती निवडले जाणार आहेत. पुढील अडीच वर्षे निवडायच्या नव्या सभापतींच्या आरक्षणाची सोडत 16 डिसेंबरला होणार आहे.
पुरुष आणि महिला अशा जाती-जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात होणार आहे.

यामध्ये अनुसूचित जाती (महिला) यांच्यासाठी एक सभापतिपद, नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्गासाठी (विमुक्त जाती व भटक्‍या जमातीसह) एक सभापतिपद, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (महिला) (विमुक्त जाती व भटक्‍या जमातीसह) राखून ठेवावयाच्या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीच्या पदांची संख्या दोन असेल, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीच्या पदांची संख्या तीन असेल.

सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी चार पंचायत समितीची सभापतिपदे आरक्षित होतील. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे पदाधिकारी यांच्यासह नागरिकांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.