ओबीसी आरक्षणासाठी येत्या 26 जून रोजी राज्यात चक्काजाम आंदोलन: पंकजा मुंडे

मुंबई : “ओबीसींचं आरक्षण घालवून ठाकरे सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळ खंडोबा केला आहे. त्याविरोधात येत्या 26 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल,” असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानावर ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. जवळपास तीन तासांच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधला. “महाविकास आघाडीच्या चुकीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. राज्य सरकारने ओबीसींचं राजकारण संपवलं आहे. त्यामुळेच या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही येत्या 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार आहे,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

“ओबीसींना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही. तसा निर्णयच आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे,” अशी माहिती पंकजा मुंडेंनी दिली.

“सरकारला भरपूर अधिकार असतात. त्यावेळी आमच्याकडे निर्णयक्षमता होती. योग्य निर्णय घेण्याची आमची नियत होती. त्यामुळे आम्ही हे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी आम्ही पावलं टाकली आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा