InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मराठा आरक्षणाला आव्हान; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मराठा आरक्षण कायद्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य सरकारने 50 टक्क्यांच्या वर आरक्षण जाहीर करणं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे. तसंच एखाद्या समाजाला 16 टक्के आरक्षण देणं हे संविधानाच्या तरतुदींविरोधात असल्याचं सांगत, अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका सादर केली आहे. यामुळे सरकारला मराठा आरक्षणासाठी न्यायालयात लढाई लढावी लागणार आहे.

अॅड.सदावर्ते यांनी आज सकाळी ही याचिका हायकोर्ट रजिस्ट्रारकडे सादर केली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक लॉजिंग नंबरही (PIL no. 34280 of 2018) मिळाला आहे. मात्र या प्रकरणाची सुनावणी कोणत्या खंडपीठासमोर होते हे पाहावं लागेल. कारण हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांचं खंडपीठ बुधवारी न्यायलायीन कामकाजासाठी उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.