InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

चंद्राबाबूंचा मोदी सरकारला मोठा झटका; राज्यात सीबीआयचे दरवाजे केले बंद

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मोदी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यात सीबीआयला दरवाजे बंद केले आहेत. राज्यात सीबीआयचं काम राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करेल, असं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये जाण्यासाठी आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे.

सीबीआय दिल्ली विशेष पोलीस प्रतिष्ठान कायद्यानूसार कार्यरत आहे. प्रत्येक राज्य सरकार सीबीआयला त्या त्या राज्यात तपासासाठी परवानगी देते.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply