Chandrakant Khaire | “एकनाथ शिंदे तर टेम्पररी मुख्यमंत्री आहेत”, शिंदेंच्या सभेवर चंद्रकांत खैरेंचा टोला

मुंबई : राज्यातील सत्तांतर नंतर विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर वारंवार टीका करताना दिसत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आज पैठणमध्ये होत आहे. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी टीकेचा बाण सोडला आहे.

चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सोडला टीकेचा बाणः

शिवसेना प्रमुख बाळासाबे ठाकरे यांनी गर्व से कहों हम हिंदू है!, ही घोषणा दिली, ती देशभर गाजली. तुम्ही घोषणा विसरलात काय? , असा सवाल खैरेंनी विचारला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली असून आता शिंदे त्यांना प्रत्युत्तर देणार ता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सभे आधी एक ऑडीओ क्लिप व्हायरलः

यादरम्यान, सर्वात धक्कादायक म्हणजे मुख्यमंत्री शिंदेच्या सभे आधी एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. तसेच या ऑडीओ क्लिपमध्ये पैसै देऊन गर्दी जमा करण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. मात्र, ही कितपत खरं आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.

दरम्यान, टेम्पररी मुख्यमंत्री म्हणत खैरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचण्याचं काम केलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.