Chandrakant Khaire | महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगली म्हणजे भाजपचा लोकसभेचा प्लॅन; चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप

Chandrakant Khaire | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये ठिकठिकाणी दोन गटांमध्ये वाद होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये दंगली झाल्याचं दिसून आलं  आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राज्यातील घडणाऱ्या दंगली भाजपचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन असल्याचं, चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

राज्यातील दंगली प्रकरणावर बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मतदारांची पसंती मिळणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात कुठेच जातीय तेढ निर्माण होऊ दिले नाही. मात्र, सध्या छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि शेवगावमध्ये दोन गटात वाद झाले. भाजप सरकारच्या काळात हे सगळं घडत आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “हिंदू-मुस्लिम यांना वेगळे करण्यासाठी हे सगळं राजकारण त्यांच्याकडून सुरू आहे. कारण मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या बाजूने उभा असल्यामुळे हे सर्व प्रकार घडवले जात आहे. मुस्लिम समाजाचे मत उद्धव ठाकरे यांना मिळू नये म्हणून हा सर्व डाव रचला जात आहे. या सर्व घटना म्हणजेच भाजपचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन आहे.”

“भाजपचा कर्नाटकमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे ते आता महाराष्ट्रात कामाला लागले आहे. त्यांना विधानसभा हवी आहे. मात्र, राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला एकमत करायचं ठरवलं आहे. राज्याचे आगामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार आहे”, असं देखील ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या