Chandrakant Khaire | “सत्तारांनी शिंदेंच्या मागेपुढे फिरून कॅबिनेट मंत्रिपद घेतलं”; चंद्रकांत खैरेंची खोचक टीका 

Chandrakant Khaire | औरंगाबाद : शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. याच पार्वश्वभूमीवर माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राज्याचे कृषिमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर सडकून टीका केलीय.

ते म्हणाले, “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांना काय नाही दिलं. असं असताना हे उद्धव ठाकरेंना सोडून गेले, शिवसेना सोडून गेले. तिकडे एकनाथ शिंदेंच्या मागेपुढे फिरून कॅबिनेट मंत्रिपद घेतलं, मात्र इकडे कॅबिनेट मंत्रिपद मिळालं नाही का? कशासाठी हे सर्व सुरू आहे? इथेही ते कॅबिनेट मंत्री होते.”

चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले, “सत्तार नावाचा हा हिरवा साप संभाजीनगर कधीच म्हणत नाही, ते औरंगाबाद म्हणतात. एकदा डीपीडीसीमध्ये मी माईकने मारणार होतो. तेव्हा पतंगराव कदम माझ्या बाजूला होते. ते म्हणाले खैरे तुम्ही पालकमंत्री होता, असं मारामाऱ्या करू नका.”

दरम्यान, अब्दुल सत्तारांनी खैरेंच्या डोक्यावर गोमुत्र टाकण्याचं विधान केलं होत. त्यांच्या या वक्तव्याला चंद्रकांत खैरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, “अब्दुल सत्तार म्हणाले की, खैरेंचं काय राहिलं, खैरेंच्या डोक्यावर गोमुत्र टाका. सत्तारांना हे कळत नाही की गोमुत्र किती पवित्र असतं. आम्ही रोज घरात हिंदुत्वाप्रमाणे गोमुत्र शिंपडतो, आम्ही हिंदुत्व जाणतो. मात्र, हे वाटेल तसं बोलतात.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.