Chandrakant Khaire | “सोमय्या ईडीचा दलाल, ईडीच्या पैशातून त्यांना कमिशन मिळतं”- चंद्रकांत खैरे
Chandrakanat Khaire | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर ईडीने करावाई केली आहे. ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी ईडीने (ED) शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांच्यावर केलेल्या कारवायामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
त्यातच आता ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी खळबळजनक दावा केला आहे. चंद्रकांत खैरे यांनी आता भाजपचे नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) यांना धारेवर धरत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
“सोमय्या ईडीचा दलाल, ईडीच्या पैशातून त्यांना कमिशन मिळतं”
“किरीट सोमय्या ईडीचा दलाल आहे. ईडीच्या पैशातून सोमय्या यांना कमिशन मिळेल. हे असेच असतात. इन्कम टॅक्सला ज्या खबऱ्याने माहिती दिली, त्या खबऱ्याला त्यांना काहीतरी द्यावे लागत असते. तसेच याचं काम आहे”, असे चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.
“उद्या कोणाकडे धाड पडणार हे भाजपवाल्यांना आधीच कळतं”
“ईडीच्या कारवाईबाबत आधीच या भाजपच्या माणसाला कसे काय कळते की, उद्या कोणाकडे धाड पडणार आहे. त्यामुळे काहीतरी मिलीभगत करून भाजप नागरिकांना आणि इतर पक्षाच्या लोकांना त्रास देत आहेत. हे सर्व किरीट सोमय्या हेच करत आहेत. सोमय्या यांची स्वतःची अनेक लफडी आहेत. त्यामुळे सरकार येतात आणि जातात, त्याचे काय होते यांचे पुढे पाहा”, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- Narayan Rane | “येत्या २ महिन्यात नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
- Kalicharan Maharaj | “सत्तेसाठी हिंदूंचा विश्वासघात केल्यानेच नावही गेलं अन् चिन्हही”; कालिचरण महाराजांची ठाकरेंवर जहरी टीका
- Sushma Andhare | “त्यांच्या पत्रकार परिषद म्हणजे नाक्यावरच्या बंबाट्या”; सुषमा अंधारेंची सोमय्यांवर जहरी टीका
- Sushma Andhare | “प्रिय निलू बाळा…”; निलेश राणेंनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंचा खोचक टोला
- Pragya Singh Thakur | “विदेशी महिलेचा मुलगा देशभक्त असूच शकत नाही, गांधीना देशाबाहेर हाकला”; साध्वी प्रज्ञांसिंहचं वादग्रस्त वक्तव्य
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.