Chandrakant Khaire | “हवन करून तुमची सत्ता उलथवून टाकतो”; चंद्रकांत खैरे यांचे वक्तव्य

Chandrakant Khaire |  औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणवत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातोय. याच पार्वश्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

बंड पुकारत महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या चाळीस समर्थक आमदारांसोबत गुवहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. चार महिन्यानंतर आता शिंदे सरकारमधील ते सगळे आमदार आणि मंत्री पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर चंद्रकांत खैरे खैरेंनी टीका केलीय. “दक्षिण मुखी मारोतीसमोर आता असे हवन करतो की तुमचे सरकार उलटे पालटे होईल”, असं ते म्हणालेत.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खैरेंना आमच्यासोबत कामाख्या देवीच्या दर्शनाला चला अशी आॅफर दिली होती. यावर खैरे म्हणाले, “उदय सामंत यांनी मला आॅफर दिली, पण मला त्याची गरज नाही, तुम्ही आता कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहात, मी २२ वर्षापासून जातो. गद्दारीनंतर तुम्ही सत्ता आणि स्वार्थासाठी तिथे गेला होतात. त्यानंतर मी जाऊन आलो आणि उद्धव साहेब आणि शिवसेनेसाठी प्रार्थना, पुजा केली आणि तुमचे सरकार अडचणीत आले.”

आता तुम्ही जाऊन आल्यानंतर मी पुन्हा तिथे जाईन आणि अशी पुजा करेल की तुमचे सरकार उलटे होवून जाईल. सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यानंतर बघा काय होते ते असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला दिला आहे. मी दक्षिणमुखी मारूतीसमोर हवन करणार आहे, त्यानंतर तुमचे सरकार राहते का? तेही पहा, असंही खैरे यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.