Chandrakant Khaire । “अब्दुल सत्तार यांना गाडल्याशिवाय राहणार नाही”; चंद्रकात खैरे आक्रमक
Chandrakant Khaire । मुंबई : टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात बोलताना शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले. “खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. यावरून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार करत आदित्य ठाकरेंचा ‘छोटा पप्पू’ असा उल्लेख केला. यावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच पेटले आहे.
आदित्य ठाकरेंवर केलेल्या या टीकेमुळे चंद्रकात खैरे आक्रमक झाले आहेत. अब्दुल सत्तार यांना गाडल्याशिवाय राहणार नाही अशी आक्रमक भाषा खैरे यांनी केली आहे. अब्दुल सत्तार हा हिरवा सापच आहे. तो हिरवा सापच नसून रंग बदलणारा सरडा आहे, तो आधी हिरवा साप होता. आता सरडा झाला आहे, अशी घणाघाती टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे की सत्तार भाजपमध्ये आले होते, पण स्थानिक भाजपने त्यांना नाकारले. त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना शिवसेनेत घ्यावे लागले आणि निवडूण आणावे लागले, मात्र तेव्हाही सत्तार हिरवा साप होते नंतर भगवा झाला होता आता ते सरडा झाले आहे, अशी जहरी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. सत्तारांनी मुस्लिमांच्या जमीनी हडपल्या असा आरोपही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
आम्ही शिवरायांसमोर शपथ घेतली आहे. सत्तार यांना गाडल्या शिवाय राहणार नाही. सत्तार यांनी मुसलमानांच्या जमिनी हडपल्या. माझ्याकडे कागदपत्रं आहेत. त्यांनी शाळेतील लोकांची खोटी कामे केली आहेत, असा दावा करत खैरी यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चंद्रकांत खैरे यांनी आरोप केल्यानंतर सत्तार यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय.
एखादा निवडून आलेला खासदार आमदार यांच्याशी चर्चा केली तर ठीक आहे. परंतु, ज्याची किंमतच मायन्स झिरो आहे अशा माणसावर माझ्यासाठी उत्तर देणे उचित नाही मी हिरवा आहे का काळा आहे. की कसा आहे हे त्याला पूर्ण दाखवून दिले आहे. स्वतः गाडलेला माणूस आहे. तो आमदार नाही, खासदार नाही तो काय मला गाडण्याच काम करेन असा पलटवार करत सत्तार यांनी चंद्रकांत खैरेंवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sachin Sawant । “गुजरातच्या हितासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहेत”; सचिन सावंतांचा खोचक टोला
- Chhagan Bhujbal । “आता महाराष्ट्रातील तरुणांनी काय करायचं?, आरती करा, हनुमान चालीसा करा, मोर्चे करा…”; छगन भुजबळ संतापले!
- Maharashtra । शिंदे-फडणवीस सरकारच्या ३ महिन्यांच्या काळात महाराष्ट्राने ‘हे’ ४ मोठे प्रकल्प गमावले
- Ajit Pawar । “ शिंदे-फडणवीसांनी त्यांच्या मंत्र्यांना जरा…”; अजित पवारांचा जोरदार हल्लाबोल
- Ajit Pawar । “जे लाव रे तो व्हिडीओ म्हणायचे, त्यांचे..”; अजित पवारांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.