Chandrakant Khaire । “ती खासदार बाई खूप टरटर करत होती, पण बच्चू कडूंनी आता माघार घेऊ नये”

Chandrakant Khaire । मुंबई : रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यावर, शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले होते. यानंतर आता 1 नोव्हेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिला आहे. बॉम्ब कुठे आणि कसा फोडायचा हे आपल्याला बरोबर माहीत असल्याचं ते म्हणालेत. या वादात आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी उडी घेतलीये.

याबाबत माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) यांचे नाव न घेता म्हणाले, ती खासदार बाई खूप टरटर करत होती. पण आता बच्चू कडूंनी चांगला संघर्ष उभा केला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या परिवाराबद्दल जे कुणी वाईट बोलतील, टिका टिप्पणी करतील, ते कधीही यशस्वी होणार नाहीत. बच्चू कडू मूळ शिवसैनिकच आहेत आणि आजही त्यांचा तोच बाणा कायम आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यांची भूमिका योग्य आहे आणि हीच भूमिका घेऊन त्यांनी पुढे जावे. अर्धवट सोडू नये, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटले.

दरम्यान, याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे. राज्यातील अपक्ष आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. बच्चू कडू यांनी त्याची सुरुवात केली असल्याचे खडसे म्हणाले. बच्चू कडू म्हणतात की, माझ्यासोबत सात ते आठ आमदार आहेत आणि आता सात आठ आमदार घेऊन ते बाहेर पडतात का हीच परिस्थिती शिंदे यांच्यासह असलेल्या 50 60 आमदारांची असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही त्यामुळे अनेक आमदार अस्वस्थ आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार न झालेले अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. त्यापैकीच एक बच्चू कडू पण आहेत. बच्चू कडू यांचे मंत्रिमंडळामध्ये नाव आहे. बच्चू कडू यांच्याबरोबर आणखी सुद्धा आमदार येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा अंदाज ही त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्याः

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.