Chandrakant Patil | “अजित पवार यांची निधी वाटपातील असमानता आम्ही रोखली”

Chandrakant Patil | पुणे : महाविकासर आघाडी सरकार असताना, आघाडीमधील मंत्र्यांना अधिक निधी दिला जात होता. परंतू आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यामुळे तो निधी निम्मा केला असल्याचं समजतं आहे.पुणे जिल्ह्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जवळच्या आमदारांना अधिक दिलेला निधी आम्ही निम्मा कमी केला आहे. निधी वाटपावरून राजकारण करणार नाही. सर्व आमदारांना समान निधी देण्याचे धोरण स्वीकारलं असल्याचं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)

पत्रकार परिषद घेतली असता, त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात स्वतःसाठी 80 कोटी. दिलीप वळसे पाटील, अण्णा भरणे यांना प्रत्येकी 40 कोटी रुपये इतका निधी दिला. अन्य आमदारांना दहा ते बारा कोटी निधी दिला होता. निधीमध्ये समानता आणण्यासाठी ज्यांना अधिक निधी मिळाला तो मी निम्मा कमी केला आहे. निधी वाटपात समान असावे ही यामागची भूमिका असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच, कोल्हापुरात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील राज्यपालांची समन्वय बैठक झाली. याविषयी विचारणा केली असता मंत्री पाटील म्हणाले, सीमा प्रश्नासारखे न्यायालयीन वाद वगळता उभय राज्यांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन्ही राज्यपालांची ही सकारात्मक सुरुवात म्हणावी लागेल. पुढील टप्प्यात दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही एकत्र यावे लागेल, अशी अपेक्षाही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर त्यांना गुजरात निवडणुकीविषयी विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, एखाद्या राज्याची निवडणूक लागली की भाजप युद्ध समजून प्रचार कार्याला लागतो. ती जनसंघापासूनची रणनीती आहे. भाजप एक कुटुंब होऊन लढत असल्याने यश मिळते. यापूर्वी अन्य राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही गेलो होतो. गुजरातमध्येही जाऊन प्रचार करून पुन्हा सत्ता राखू.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.