Chandrakant Patil | “उद्धव ठाकरेंचं गणित बहुतेक कच्चं आहे, आता ते…”, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

Chandrakant Patil | मुंबईदोन दिवसांपूर्वी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मराठवाडा दौरा केला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केल्या. त्यावर भाजप पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)

2019मध्ये जेव्हा सरकार अस्तित्वात नव्हतं, असा महिन्याभराचा काळ होता. तेव्हा शेतीही माहिती नव्हतं, बांधही माहिती नव्हता, तरी अतीवृष्टीमध्ये गावोगाव फिरले, शेतावरच्या बांधावर फिरले, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. शेतकऱ्यांना आश्वस्त करून मागणी केली की 25 हजार रुपये हेक्टरी मदत मिळायला हवी. त्यानंतर अडीच वर्षं सरकार होतं. पण 25 हजार हेक्टरी मदत मिळाली नाही.

आत्ता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वाखाली आलेल्या सरकारने जूनपासून जे जे शेतकऱ्यांवर संकट आलं, त्या प्रत्येकाचा पंचनामा करायला लावून प्रत्येकाची नुकसानभरपाई दिली. ती दुप्पट दिली. आता त्यांचं गणित बहुतेक कच्चं आहे. ते 25 हजार विसरले, आता 50 हजार रुपये म्हणत आहेत. 50 हजार काय, एक लाख रुपये द्यायला हवे होते. पण मग तुमच्या काळात का नाही दिले?.

दरम्यान, ज्या गावात शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली त्या वेळी त्यांनी हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी अशी मागणी केली. शिवसेना या मागणीच्या पाठीशी आहे. आता काय दिसले म्हणजे ओला दुष्काळ जाहीर होईल, हे माहीत नाही; पण सरकारला पाझर फुटत नसेल तर आसूड घेऊन शेतकऱ्यांनीच त्यांना घाम फोडावा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.