Chandrakant Patil | “उद्धव ठाकरेंनी स्वत:चं हसं करून घेतलं!”; चंद्रकांत पाटलांची टीका
Chandrakant Patil | कोल्हापूर : अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे खूप नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्याकरीता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा (Marathwada) दौरा केला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर शेतकरी हसले. उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले आहेत. शेतकऱ्यांना पन्नास हजार का लाख रुपये द्यायला पाहिजे होते तुमच्या काळात असा का निर्णय घेतला नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
पुढे ते म्हणाले, “२०१९ मध्ये जेव्हा सरकार अस्तित्वात नव्हतं, असा महिन्याभराचा काळ होता. तेव्हा शेतीही माहिती नव्हती, बांधही माहिती नव्हता, तरी अतीवृष्टीमध्ये गावोगाव फिरले, शेतावरच्या बांधावर फिरले. शेतकऱ्यांना आश्वस्त करून मागणी केली की २५ हजार रुपये हेक्टरी मदत मिळायला हवी. त्यानंतर अडीच वर्षं सरकार होतं. पण २५ हजार हेक्टरी मदत मिळाली नाही”, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.
महायुतीच्या चर्चांवरही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भाष्य केलंय. भाजप, मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची महाविकास आघाडी असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव असेल तर महाराष्ट्रात भाजपचे 13 कोर कमिटीचे सदस्य बसून निर्णय करतात.या विषयासाठी कोर कमिटीची कोणतीही बैठक झालेली नाही. असा कोणताही प्रस्ताव चर्चेला आला नाही, त्यामुळे ज्या प्रस्तावाची चर्चाच नाही. त्या प्रस्तावाबद्दल मी काय बोलणार?, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.
शंभूराज देसाई यांनी शिंदे सरकारबद्दल केलेलं विधान खरंच आहे कारण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेत असलेल्या निर्णयाबद्दल सर्वसामान्य माणूस समाधानी होत असल्याचं पाटील . पंधरा वर्षेच नाही तर हे सरकार पुढील अनेक वर्ष शिवसेना भाजपचे राहील, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलाय. दरम्यान त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Deepak Kesarkar | “फक्त लोकांना भडकवून सरकार चालवता येत नाही, त्यासाठी…”; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
- Supriya Sule | अखेर सुप्रिया सुळेंनी ‘तो’ शब्द पाळला, गावकऱ्यांचा पेढे वाटून जल्लोष
- NCP | राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का! दिवाळीनंतर ‘या’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
- NCP | “हे सरकार स्वतःच्या आनंदाची दिवाळी साजरी करतंय”, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा
- Britain | ऐतिहासिक! भारतीय ऋषी सुनक बनणार ब्रिटेनचे पंतप्रधान, मॉर्डंट यांची माघार
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.