Chandrakant Patil | “गुलाबराव पाटलांसारखी माणसं…”; गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

Chandrakant Patil | मुंबई : “आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,” असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं होतं. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात वेगळीच खळबळ उडाली होती. याबाबत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“नागपूरपासून दादरपर्यंत सर्व आमदार गेले. मी एकटाच राहिलो असतो. मग, विकास करू शकलो असतो का? एकूण 40आमदार फुटले. त्यात 33 नंबरला मी गेलो, पण उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात होते. त्यांना विनंती केली, हात जोडले, पाया पडलो”, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

“मंत्रीपदाचा सट्टा लावूनचा शिंदेंबरोबर”

“आपल्यातील एक मराठा चेहरा लांब जात आहे. तो जाता कामा नये. त्यांना समजवलं पाहिजे, असं उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यावर संजय राऊत म्हणाले, जायचं तर जाऊदे. मग मी पण गेलो. सरपंच पदाचा राजीनामा देताना लोकं विचार करतात. आम्ही तर आठ मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. बहुमताचा आकडा जमला नसता तर? मात्र, आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावूनचा शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,” असं गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यावरुन आता चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrakant Patil talk about Gulabrao patil’s Statement

“गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं ग्रामीण भागात वाढली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत ते बोलले. शहरी भागात जरा पॉलिश करून बोलतात. जसं की, आम्ही ‘रिस्क’ घेतली. त्या ‘रिस्क’ला गुलाबराव पाटील ‘आम्ही सट्टा खेळलो’ असं म्हटले”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी गुलाबरावांच्या वक्तव्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.