Chandrakant Patil | पुण्यात ‘राष्ट्रवादी पुन्हा…’ हे गाणे वाजवून केले चंद्रकांत पाटील यांचे स्वागत!

Chandrakant Patil । पुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातील रास्ता पेठेत असलेल्या एका कार्यक्रमानिमित्त पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमासाठी पुण्यात उपस्थित होते. या कार्यक्रमस्थळी त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. चंद्रकांत पाटील येताच मोठ्या आवाजात गाणं वाजवण्यात आलं. पण गंमत म्हणजे ते गाणं होतं ‘राष्ट्रवादी पुन्हा…’. यानंतर पोलिसांनी तिथे गाणं वाजवणाऱ्या डीजेला अटक केली.

चंद्रकांतदादा कार्यक्रमाला येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचार गीत असलेले ‘राष्ट्रवादी पुन्हा…’ गाणं वाजविल्याने पुणे शहरात त्याची एकच चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनापरवाना साउंड सिस्टीम उभारण्यात आली होती, त्यामुळे संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रास्ता पेठेतील एका कार्यक्रमावेळी चंद्रकांत पाटील आल्यानंतर उपस्थितीत ‘डीजे’वर अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत लागले आहे, त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

पोलिसांनी डीजेला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. साऊंड सिस्टीम उभारण्यासाठी परवानगी घेतलेली नव्हती असं कारण देत त्याला ताब्यत घेण्यात आलं आहे. या घटनेनंतर सगळीकडे या कारवाईसंदर्भात चर्चा सुरू आहे. कारण, कट्टर विरोधक असलेल्या भाजपच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचारगीत वाजविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अचानकपणे हे गाणं वाजल्याने अनेकांकडून सखेद आश्चर्यही व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.