Chandrakant Patil | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्त टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. या उमेदवारीबाबत आता भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी स्पष्टकरण दिले आहे.
“शुक्रवारी रात्री मी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टिळकवाड्यात जाऊन शैलेंद्र टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली. यावेळी दोघांशीही चर्चा करून भारतीय जनता पक्ष त्यांना सन्मानाचे स्थान देईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. दोघांनीही आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणार आहोत, असे सांगितले आहे”, अशी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.
उमेदवारीवरून जगताप कुटुंबियांमध्ये वाद असल्याची चर्चा होती. याबाबत विचारलं असता, “जगताप कुटुंबियांमध्ये उमेदवारीवरून कोणताही वाद नाही. “लोकांनी यााबाबत अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण जगताप यांचा मुलगा वयाने लहान आहे, पण त्याने काल समजदारीची भूमिका घेतली आणि आमच्या कुटंबात कोणताही वाद नसल्याचे म्हटलं. मी नेहमी सांगतिलं आहे की जर अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली तर, शंकर जगताप हे निवडणुकीचे प्रमुख असतील. आज मी पुण्याचा पालकमंत्री म्हणून शंकर जगताप यांना निवडणुकीचे प्रमुख घोषित करतो”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- INC | “सरकार आधीच अस्थिर, मंत्रिमंडळ विस्तार झाला तर कोलमडेल”; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा
- Shivsena | वरळीतून लढवून दाखवण्याचं ठाकरे गटाचं चॅलेंज शिंदे गटाने स्विकारलं; ‘या’ रणरागिणीने उचलला विडा
- Pune By poll Election | पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची नावे
- Jitendra Awhad | गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ टीकेचा आव्हाडांनी घेतला समाचार
- Sanjay Raut | “पंतप्रधान मोदी अशा खोटारड्या माणसाला सोबत कसं ठेवतात?”; राऊतांचा निशाणा कुणावर?