Chandrakant Patil | “भीक मागणं हे शब्द प्रबोधनकार ठाकरेंचेच”; चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिलं ‘ते’ पुस्तक

Chandrakant Patil | नागपूर : भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. हा मुद्दा बराच पेटला. या संदर्भात आंदोलनं देखील झाली. चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितल्यानंतर देखील त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.

हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात देखील विरोधक मांडत आहेत. अशातच हिवाळी अधिवेशनात आज घडलेल्या एका प्रसंगाची जोरदार चर्चा सुरु आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचं ‘माझी जीवनगाथा’ हे पुस्तक भेट म्हणून दिले. त्यातला ‘भीक मागणं’ हा उल्लेख वाचून दाखवला.

आपण वापरलेल्या शब्दात काही गैर नव्हतं, हे पटवून देण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक दाखवत आपली बाजू मांडली. या पुस्तकात एखाद्या कार्यासाठी फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे असाच अर्थ होतो, असा उल्लेख आहे. हा उल्लेख चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना वाचून दाखवला.

चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य काय?

पैठणमधल्या एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.