Chandrakant patil | “माझा हिशोब चुकता करायचा असेल, तर…”; सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा पलटवार

Chandrakant patil | मुंबई : शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या प्रबोधन यात्रेतील मुक्ताईनगर सभेला प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यानंतर सुषमा अंधारेंनी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘मी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा हिशोब मुक्ताईनगरमध्ये सभा घेऊनच करेन’, अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“माझा हिशोब चुकता करायचा असेल, तर सर्वांना माझं ‘ओपन चॅलेंज’ आहे”, असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी दिलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, “सुषमा अंधारेंनी हिशोब चुकता करण्याबाबत वक्तव्य केल्याचं मी ऐकलं नाही. मात्र, कुणाला असा हिशोब चुकता करायचा असेल, तर त्यांना माझं कधीही ‘ओपन चॅलेंज’ आहे. त्या येऊ शकतात.”

पुढे ते म्हणाले, “ही लोकशाही शासन प्रणाली आहे. प्रत्येकाला इथं येण्याचा आणि सभा घेण्याचा अधिकार आहे. उलट आम्ही मदत करू, त्यांनी कधीही यावं आणि सभा करावी,” असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं.

दरम्यान, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरात राज्य सरकारची बदनामी करा असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसे यांना चांगलाच टोला लगावला आहे. एकनाथ खडसे यांच्याकडून कोणतेही चांगले काम होऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी खडसेंवर निशाणा साधलाय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.