Chandrakant Patil | “मातोश्रीमध्ये राहुनच माणसांची दु:ख कळतात. मात्र…”; ठाकरेंच्या दौऱ्यावरुन चंद्रकात पाटलांचा हल्ला

मुंबई : परतीच्या पाऊसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा दौरा केला. तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही नाशिक दौरा करत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्या समस्या समजून घेतल्या असल्याचं समजतं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)

महात्मा गांधींसारखे नेते निर्माण झाले याचं कारण की ते देश फिरले, सर्वसामान्य माणसांचं मन समजून घेतलं, हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना उशिरा कळलं. यांना बराच काळ असं वाटलं की मातोश्रीमध्ये राहुनच माणसांची दु:ख कळतात. मात्र, आता त्यांना साक्षात्कार झाला आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर चांगलाचा वार केला आहे. पाटलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले, मदतीला दिले नाहीत. पण आम्हाला राजकारण करायचं नाही. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि याबाबतचा आवाज आम्ही विधानसभेत उठवू. त्याचबरोबर प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू, असे आश्वासन ठाकरे यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिले आहे.

यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावर मागण्या करताना आपण सत्तेत असताना या गोष्टी केल्या नाहीत, याची आठवण ठेवावी. असं म्हणत एकप्रकारे चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना खोचक सल्लाच दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.