Chandrakant Patil | “संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही, त्यामुळे…”; चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर निशाणा 

Chandrakant Patil | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. याच पार्वश्वभूमीवर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ५० रेडे पुन्हा एकदा गुवाहाटीला चालले आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. या टीकेला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांमुळे हे सगळे आमदार शिंदे गटात सामील झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

ते म्हणाले, “रोज एक एक माणूस आपल्यातून निघून जातोय त्याकडे संजय राऊतांनी लक्ष द्यायला हवे. संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही. त्यामुळे ते काहीही विधाने करतात.” राऊत जेलमध्ये होते. आत ते जामीनावर बाहेर असल्याने त्यांच्याबाबत काही न बोललेले बरे. ते गुन्हेगार आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

“५० लोक सोडून जाण्याला खऱ्या अर्थाने संजय राऊतच कारणीभूत आहेत. ही लोक परत आली असती, पण संजय राऊतांसारख्या निष्ठूर माणसामुळे एकही माणूस जोडू शकला नाही. अशी लोक काहीही बोलतात. बोलण्याची काहीतरी पद्धत असते,” अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.

“संजय राऊत महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही, असं वक्तव्य करतात. त्यांच्याकडे शिंदे गटावर बोलण्यासारखं आता काहीही उरलं नाहीये, त्यामुळे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही, अशी विधानं करतात”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना चिमटा काढला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.