Chandrakant Patil | “सुप्रिया ताई तुम्ही काळजी करु नका, सरकार…”; चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई : अतिशय व्यवस्थीत प्रशासन सुरु आहे. तूम्ही तर घराच्या बाहेरच पडत नव्हता. त्यामुळे सुप्रिया सुळे म्हणाल्या दोन दोन मुख्यमंत्री पाहिजेत. एक प्रशासनाला आणि एक फिरायला. ताई तुम्ही काळजी करु नका. हे सरकार पण चालवत आहे आणि फिरतात पण असा टोला उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवदीप शैक्षणिक संस्थेच्या वतीने परिसरातील किर्तनकारांचा जाहिर सत्कार सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भाजपचे आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार आणि जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे आदी मान्यवर उपस्थि होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षणासोबत स्कील डेव्हलमेंटवर भर दिला पाहिजे.इतकेच नाही तर बीए. बीएस्सी करुन चालणार नाही. हे सामान्य ज्ञान आहे. बीएस्सीसोबत स्कील डेव्हलपमेंट केले पाहिजे. ज्यामुळे ज्ञान आणि कौशल्य वाढणार. त्याचा फायदा तरुणाना रोजगारासाठी होणार याकडेही मंत्री पाटील यांनी लक्ष वेधले

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.