Chandrakant Patil | ‘हू इज धंगेकर’ म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना धंगेकरांबद्दल विचारल्यावर बोलती बंद
Chandrakant Patil | पुणे : भाजपचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी ‘हू इज धंगेकर’ असं म्हणाले होते. त्यानंतर कसब्याच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा प्रचंड मतांनी विजय झाला. निकालानंतर चंद्रकांत पाटलांच्या ‘हू इज धंगेकर’ या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
“This Is Dhangekar”
रवींद्र धंगेकरांनी पाटलांच्या प्रश्नाला ‘दिस इज धंगेकर’ असं उत्तरही दिलं. भाजपचा कसब्याचा गड हिसकावून घेतल्यानंतर ‘मी आहे धंगेकर’ असे प्रत्युत्तर नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिले. त्याबाबत पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री पाटील यांना विचारले असता ‘ठीक आहे’ असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी बोलणं टाळलं आहे.
28 वर्षांचा भाजपचा गड धंगेकरांनी भेदला
अवघ्या महाराष्ट्राचं या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. कसबा हा भाजपचा गड मानला जात होता. हा मतदारसंघ सलग 28 वर्षे भाजपकडे होता. विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी सलग 25 वर्षे आणि आता दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांनी 3 वर्षे प्रतिनिधित्व केले. हाच भाजपचा गड आता काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी उद्ध्वस्त केला आहे.
भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. केंद्रीय ते राज्य पातळीवरील नेते प्रचारात उतरले होते. मात्र तरीही भाजपच्या पदरी निराशाच आली. भाजपने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित भाजपला पराभव पत्कारावा लागला नसता.
दरम्यान, आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना तुम्ही म्हणालात ‘हू इज धंगेकर’, कसब्याचे आमदार म्हणाले की, ‘मी आहे रवी धंगेकर’ असे विचारले असता पालकमंत्री पाटील ‘हो, ठीक ठीक चला’, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी बोलणे टाळले आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Sanjay Raut | “2024च्या विधानसभेला महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील”; राऊतांचा विश्वास
- Abhijeet Bichukle | “कसब्यातली भाजपची सत्ता काँग्रेसला गेली हा माझा पायगुणच”
- Pomegranate Benefits | डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- Job Opportunity | विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Buttermilk Benefits | वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत ‘हे’ आहेत उन्हाळ्यामध्ये ताक पिण्याचे फायदे
Comments are closed.