‘काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन राम जन्मभूमी, सावरकरांबद्दलची भूमिका शिवसेनेला सोडता येईल का?’

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन राम जन्मभूमी आणि सावरकरांबद्दलची भूमिका शिवसेनेला सोडता येईल का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी सेनेला केला आहे. अप्रत्यक्षपणे आमच्याशिवाय पर्याय नसल्याचे सेनेला सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ही टेंपररी फेज आहे, लवकरच सत्तास्थापनेचा तिढा सुटेल, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रपती राजवटीची शक्यता त्यांनी फेटाळली. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी यांची चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवस उलटले तरीही राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. जर आज काही निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कालवधी वाढवून देऊ शकतात किंवा मग राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.