InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘पवार घराण्यातील एक ही व्यक्ती लोकसभेत जाणार नाही’

शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबाने घराणेशाहीचा उत आणला आहे, आधी उमेदवारी जाहीर करून पुन्हा पराभव दिसल्याने पवार यांनी माघार घेतली, आता त्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती लोकसभेत जाणार नाही, अशी परिस्थिती असल्याचे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात युतीचा विजय होईल, साताऱ्यात देखील युतीचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या सभांचा काही परिणाम होणार नाही, असेही पाटील म्हणाले.

पाटील यांनी तपोवन मैदान येथील डी. डी. शिंदे सरकार शाळेत मतदानाचा हक्क बजावला, यावेळी त्यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करत, राज्यात भाजपला ४५ जागा मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply