“चंद्रकांत पाटील तुमचं जेवढं वय आहे तेवढी शरद पवारांची संसदीय कारकिर्द आहे”

मुंबई : भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमी टीकेची जुगलबंदी सुरू असते. यात कधी-कधी अतिरेक होतो. चंद्रकांत पाटील यांच्याकडून असेच झाले. शरद पवारांवर टीका करताना ते म्हणालेत ‘राज्यात शरद पवारच आम्हाला आव्हान नाही. कारण ५४ आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळ आयुष्य गेल, कधी ६० वर तो गेला नाही.’

तसेच, चंद्रकांत पाटलांनी पवारांचा एकेरी उल्लेख केल्याने राष्ट्रवादीचे नेते संतापलेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पाटलांना उत्तर दिले. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानावरुन महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून चंद्रकांत जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांवर केलेल्या टीकेवरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

चंद्रकांत दादा आपले जितके वय नाही, तेवढी शरद पवार यांची कारकिर्द आहे, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्यात गेल्या दीड वर्षांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड रखडली आहे. राज्य सरकार आपल्या अधिकारानुसार काही आमदारांची यादी राज्यपाल्यांकडे देतात.

राष्ट्रीय शिष्टाचारानुसार राज्यपाल ती नाव मान्य करतात. मात्र, राज्यात आपली सत्ता नसल्याने केंद्र सरकार राज्यपालांना हाताशी धरुन अडवणूक करीत आहे. त्यामुळे राज्याचे हित लक्षात घेता. यावरून शरद पवार यांनी राज्यपालांचे वय झाले असून वयोमानानुसार लक्षात राहत नसल्याचे वक्तव्य केले आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा