भुजबळांबद्दल वक्तव्य करण्याऱ्या चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी : हसन मुश्रीफ

मुंबई : न्यायालयसुध्दा चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. नाहीतर चंद्रकांतदादा पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना जामीनावर सुटला आहात अशी धमकी दिली होती. यावर नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे.

दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशा पध्दतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. आजपर्यंत भाजपकडून एजन्सीचा दुरुपयोग करण्यात येत आहे हे सिद्ध झाले आहे. आता न्यायालयसुध्दा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. परंतु ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब यांच्याबद्दल पाटील यांनी केलेले दर्पोक्तीयुक्त वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. जणूकाही जामीन कोर्टातून रद्द करणार, अशा आविर्भावात चंद्रकात पाटील वक्तव्य करत होते. भुजबळ साहेबांनी संपूर्ण हयात राजकारण आणि समाजकारणात काढली आहे. त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करण्याऱ्या चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.