InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘ए..गप्प!’; चंद्रकांत पाटलांनी पूरग्रस्ताला झापलं

- Advertisement -

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पोहोचण्यास विलंब केला. त्यानंतर त्यांनी टीव्ही ९ च्या अँकरला चक्क मंत्रपदाची ऑफर दिली आणि आता चंद्रकांत पाटील यांचा नवीन प्रकार उघडकीस आला आहे.

चंद्रकांत पाटील हे पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना, पूरग्रस्तांनी त्यांच्याकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांचा संयम सुटला आणि त्यांनीही तक्रार करणाऱ्या पूरग्रस्तांना झापण्यास सुरुवात केली.

‘तुम्ही तक्रारी करु नका, सूचना करा. तक्रारी करुन काही होणार नाही, ए गप्प’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पुरात बुडालेल्या पुलाची शिरोली या गावात हा प्रकार घडला.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

- Advertisement -

शिरोलीमधून रोड सुरु झाला, तर आपल्याला जे हवं ते आणता येईल. म्हणून मी आपल्याला पार्थना करेन की विचलित न होता, न घाबरता सरकार पाठिशी आहे याची खात्री बाळगा. हे सर्व आपण नीट करु. तक्रारी करुन काही होणार नाही, सूचना करा. प्रशासनाला तक्रारी करुन काय होणार”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील बोलत असताना खालून एक व्यक्ती तक्रारीच्या सुरात आपलं म्हणणं मांडत होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, सगळं करु, सगळं करु…. त्यावेळी पुन्हा ती व्यक्त बोलू लागल्याने चंद्रकांत पाटलांचा संयम सुटला आणि ते ओरडले ये… गप्प.

    महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.