रस्ते घोटाळ्याबाबत चंद्रकांत पाटलांची तक्रार लाचलुचपतकडे करणार : हसन मुश्रीफ

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडीतील नेत्यांवरील भ्रष्ट्राचाराचे आरोप करत पुरावे मिळवण्यासाठी धाडसत्र सुरु केलंय. आज त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणणारा दावा केला आहे. अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंतर आता सोमय्यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप लावले आहेत.

मुश्रीफ यांनी केलेल्या १२७ घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. तसेच, फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचं ते म्हणाले. सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली.

यावेळी हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरच भ्रष्टाचारचे आरोप केले आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले कि,चंद्रकांत पाटील यांच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले. राज्यातील 90 टक्के रस्ते बंद आहेत. कंत्राटदार पळून गेले आहेत. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.

कायदेशीर सल्ला घेऊन अँटी करप्शनमध्ये त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे.’ असे विधान आता हसन मुश्रीफ यांनी आता केले आहे. तसेच सोमय्या हे माझी प्रतिमा डागळण्यासाठीच बोलत आहेत. माझ्यावर जेव्हा जेव्हा असे आरोप केले तेव्हा तेव्हा आरोप करणाऱ्यांवर मी 50 कोटींचे दावे केले आहेत. आता सातवा दावा करणार आहे आणि तो दावा 100 कोटींचा करणार आहे. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा