सत्तेची ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

नागपूर : राज्याच्या राजकारणात २०१९ ला आश्चर्यचकित करून सोडणाऱ्या घटना घडल्या होत्या. शिवसेनेने युती तोडत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन केले. राज्यात सर्वात जास्त जागा मिळालेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. मात्र यावरून अजूनही सतत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी पाहायला मिळतात.

यावरूनच आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या राष्ट्रवादीच्या विधानावर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. केंद्र सरकारने महाराष्ट्रात सत्तेची दिलेली ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. राष्ट्रवादीचं नाचता येईना अंगण वाकडे असं सध्या चालू आहे. सरकार स्थापन करण्याची ऑफर केंद्राने पवार साहेबांना दिली होती. तसेच केंद्रामध्ये सरकार असलेल्या पार्टीबरोबरच सत्ता स्थापन करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं असतं. त्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला हे काय म्हणतात त्याचे काय अर्थ होतात हे कळतं, असा टोला पाटील यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा