InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘चंद्रकांत पाटील यांची ‘न्यूज अँकरलाच’ मंत्रीपदाची ऑफर’

- Advertisement -

राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा नवा प्रकार उघडकीस आला आहे. टीव्ही 9 चे अँकर ऋषी देसाई यांनी पुरातील व्यवस्थापनात सरकारला आलेल्या अपयशावर कठोर प्रश्न विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी त्यांना थेट मंत्रीपदाचीच ऑफर दिली.

टीव्ही 9 चे अँकर ऋषी देसाई यांनी सरकार आणि प्रशासनाने हवामान खात्याच्या अंदाजकडे दुर्लक्ष करत आवश्यक आपत्ती व्यवस्थापन केलं नसल्याच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. देसाई म्हणाले, “मागील 9 दिवसांपासून सांगली-कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. मात्र, एनडीआरएफची पथकं केवळ 4 दिवसांपासून पूरग्रस्त भागात येण्यास सुरुवात झाली. याचं नियोजन करण्यात सरकार आणि प्रशासन कमी पडलं असं वाटत नाही का? भाजपचे आमदार शंभुराजे देसाई म्हणतात की पोलीस प्रमुख साताऱ्यात दिसत नाहीत याचा अर्थ काय? एक जबाबदार लोकप्रतिनिधी स्वतःच्याच सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत.”

Loading...

- Advertisement -

यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘तुम्हाला तरी या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो का असाही प्रश्न केला. यावर ऋषी देसाई यांनी सरकारमध्ये तुम्ही आहात, आपत्कालीन यंत्रणा तुमच्याकडे आहे तुम्ही तुमची जबाबदारी ढकलू शकत नाही, असं ठणकावलं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी टीव्ही 9 चे अँकर देसाई यांना थेट सरकारमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. ते म्हणाले, “मी आज तुम्हाला महाराष्ट्राचा मंत्री करतो. तुम्ही मंत्रीमंडळात येऊन उद्या किती पाऊस पडू शकतो हे सांगा? चंद्रकांत पाटील यांच्या या बेजबाबदार वक्तव्यानंतर देसाई यांनी त्यांना हा नायक चित्रपट नसल्याचे म्हणत सुनावले.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.