InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

चंद्रकांत पाटलांची ‘भविष्यवाणी’; १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होणार

राज्यात विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचं भाकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागेल आणि १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान राज्यात निवडणुका होतील असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आज पिंपरीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुण्याच्या पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटलांची नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर होते.

तसेच येत्या विधानसभेला बारामती जिंकण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, ‘2019 मध्ये विधानसभेला अजित पवारांना पराभूत करण्याचं माझं टार्गेट जरी असलं तरी ते प्रॅक्टिकल टार्गेट नाही. तो आशावाद असू शकतो,’ असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

‘यांचं पाणी कनेक्शन तोडा, येऊ द्या यांना बिना आंघोळीचं’; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

‘बैलगाडा शर्यत केवळ करमणुकीचे साधन नाही’; संसदेत ‘डॉ.कोल्हें’चे जोरदार भाषण

‘साले विरोधी पक्ष फालतू आहे, त्यांचं म्हणजे इकडून लफडे कर, तिकडून लफडे कर’

‘किल्ले रायगडाला राजधानीचा दर्जा द्या’; अमोल कोल्हेंची मागणी 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply