राज ठाकरेंच्या ‘चंपाची चंपी’ टीकेला चंद्रकांत पाटलांचं उत्तर

विधानसभा निवडणुकीत ‘चंपाची चंपी’ करणार असं म्हणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी आपल्यासाठी दुसरा शब्द शोधून काढायला हवा होता, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय छान आहे. त्यांनी आपला स्वतंत्र बाणा जपायला हवा होता. ‘चंपा’ हा शब्द सर्वप्रथम अजित पवार यांनी वापरला होता. तोच शब्द न वापरता राज यांनी माझ्यासाठी दुसरा एखादा शब्द शोधून काढला असता तर बरं झालं असतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज यांनी काहीतरी नवं बोलावं. तीच भाषा बोलू नये. कदाचित राज यांचा शब्दसंग्रह कमी पडला असावा. पण ते काहीही बोलले असले, तरी मी त्यांच्या पातळीवर येणार नाही, असं पाटील यांनी एका वृत्तवाहिनीच्या दिलेल्या मुलाखतीत बोलले.

Loading...

‘राज ठाकरे, अजित पवार माझी खिल्ली उडवतात. मात्र मी किती कामं केली आहेत, याची लोकांना कल्पना आहे. मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफीसारखे प्रश्न मी हाताळले. मतदारांना याबद्दल माहिती आहे. त्यामुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांना जनताच वेड्यात काढेल,’ असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.