शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांचा घुमजाव

मुंबई : भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमी टीकेची जुगलबंदी सुरू असते. यात कधी-कधी अतिरेक होतो. चंद्रकांत पाटील यांच्याकडून असेच झाले. शरद पवारांवर टीका करताना ते म्हणालेत ‘राज्यात शरद पवारच आम्हाला आव्हान नाही. कारण ५४ आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळ आयुष्य गेल, कधी ६० वर तो गेला नाही.’

तसेच, चंद्रकांत पाटलांनी पवारांचा एकेरी उल्लेख केल्याने राष्ट्रवादीचे नेते संतापलेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पाटलांना उत्तर दिले. यानंतर आता या प्रकरणात आता खुद्द चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत झालेल्या घटनेवर पडदा टाकल्याचं पाहायला मिळालं. देगलूर येथे विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

यावेळी पाटील म्हणाले, ‘शरद पवारांबद्दल मला आदर आहे, खासगी कार्यक्रमात त्यांच्याबद्दल आपण चुकून बोललो’, अशी सारवासारव त्यांनी केली आहे. पुणे येथील सत्कार समारंभाच्या कार्यक्रमावेळी थोडेच कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यावेळी चुकून शरद पवारांबद्दल आपण बोलून गेलो, असं म्हणत त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायम आदर असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी बोलताना दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा